मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
शहरानजीक असलेल्या ताहाराबाद रोडवरील सुकड नाल्याजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विरगाव येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर पाठीमागील युवक जखमी झाला.
दुचाकी (क्र. एम. एच. 41 बी. ए. 2426) वरून यशवंत ऊर्फ नाना भरत ठाकूर (27) हा विरगावकडून सटाण्याच्या दिशेने येत असताना रात्री अज्ञात वाहनाने धडक दिली. यशवंत नाना ठाकूर यास डोक्यास व चेहर्यावर जोराचा मार लागल्यामुळे त्याला तत्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
वैद्यकीय तपासणी करत असताना डॉक्टरांनी ठाकूर यास मृत घोषित केले तर जोडीदार भरत सुमा निकम गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास सटाणा ग्रामीण रुग्णालयातून मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती सटाणा येथील गौरव प्रकाश चव्हाण यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती कळताच विरगावावर शोककळा पसरली आहे.