Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रIrshalwadi Landslide : इर्शाळवाडीत बचावकार्य करताना अग्निशमन अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत बचावकार्य करताना अग्निशमन अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई | Mumbai

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी येथे काल रात्री साडे दहाच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३० ते ४० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगितले जात आहे. तसेच या घरांमधील १०० पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे…

- Advertisement -

या ठिकाणी रात्री २.३० वाजता बचावकार्य करीत असताना नवी मुंबई महानगरपालिकेचे बेलापूर येथील अग्निशमन विभागातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Irshalwadi Landslide : “अन् आई-बाबांना पळताही आले नाही…”; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम

शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भारत सरकारच्या नावाने अनेकांच्या मोबाईलवर ‘अलर्ट’, नागरिक संभ्रमात

- Advertisment -

ताज्या बातम्या