Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

- Advertisement -

सुरगाणा ते उंबरठाण मार्गावर इको गाडी क्रमांक MH-15-JM-4498 ने दुचाकी क्रमांक GJ-30-E-137 ला धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार कादीर अकील नाईकवाडे वय २८ रा. जामुनमाथा याचा नाशिक येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत कादीरचा भाऊ समीर यांने फिर्याद दिली असून शनिवारी ता. १९ जुलै रोजी कादीर हा उंबरठाण येथून रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी येत असतांना उंबरपाडा खोकरी येथे उंबरठाण कडे जाणाऱ्या इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी खड्ड्यात जाऊन पडली. वाहन चालक इको गाडी जागेवरच सोडून पसार झाला होता.

या अपघातात गंभीर जखमी कादीरला सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नाशिकच्या आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात होते. दुर्दैवाने २३ जुलै रोजी उपचारा दरम्यान अपघातात जखमी झालेला दुचाकी स्वार कादीर याचा मृत्यू झाला. कादीरच्या पश्चात आई, पत्नी, दोन महिन्याचा मुलगा आहे.

या बाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चार चाकी चालका विरुद्ध मोटार वाहन अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...