Friday, September 4, 2026
Homeनाशिकविहीरीत पडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

विहीरीत पडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील 17 नंबर चारी जवळ असलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशाल रायभान सावंत वय बारा वर्ष रा. कुडगाव, तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हल्ली राहणार 17 नंबर चारी जवळ जानोरी तालुका दिंडोरी हा सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शौचास जातो सांगून विहिरीजवर पाणी घेण्यासाठी गेला असता तोल जाऊन त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दिंडोरी पोलीस ठाण्यात या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...