Friday, March 28, 2025
Homeमुख्य बातम्यादुर्दैवी घटना : बंधाऱ्यात बुडून दोन तरुणींचा मृत्यू

दुर्दैवी घटना : बंधाऱ्यात बुडून दोन तरुणींचा मृत्यू

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील तीन तरुणी दिवाळी निमित्ताने कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या असता दोन तरूणींचा बंधाऱ्याच्या पात्रात बुडून मृत्यू झाला.तर एक तरुणी यामध्ये वाचली असून तिला मालेगांव शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की,नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील पुजा अशोक जाधव(१६), खुशी देविदास भालेकर(१६),कावेरी देविदास भालेकर (१८) या तिन्ही तरुणी वाघदरी बंधाऱ्यावर दिवाळी निमित्ताने कपडे धुण्यासाठी गेले असता पुजा व खुशी दोन्हीचा पाय घसरुन दोघी खोल पाण्यात बुडाल्या. जवळच असलेल्या काही जणांच्या लक्षात आले की मुलगी बुडत आहे त्यांनी कावेरी हिस वाचवले व अन्य दोघींना बाहेर काढून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉ.राठोड यांनी पुजा अशोक जाधव व खुशी देविदास भालेकर या दोघींना मृत घोषित केले तर कावेरी भालेकर हिस पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे याप्रकरणी नांदगाव पोलीसांत नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या