Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : विहिरीचे बांधकाम कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

दुर्दैवी : विहिरीचे बांधकाम कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

विहिरीत रिंग टाकण्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे बांधकाम करीत असतांना अकस्मात बांधकाम कोसळल्याने दोन परप्रांतीय मजूर विहिरीतील २५ फुट पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील वजीरखेडे गावशिवारात घडली. सकाळी १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

वजीरखेडे येथे विहिरीच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास राजस्थानमधील ढिकरिया येथील बजरंगपुरी हिरापुरी गोसावी (४५) व सवारीपुरी ढानुपुरी गोसावी (४५) हे दोघे मजूर विहिरीत काँक्रीटीकरणाचे काम करत असतांना ते काम करीत असलेल्या भागातील बांधकाम विहिरीत कोसळले.

याबरोबर हे दोघे मजूर देखील पाण्यात पडून बुडाले. हा प्रकार लगत असलेल्या शेतकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तो अयशस्वी ठरत असल्याने मालेगावातील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी अथक परिश्रम करीत पाण्यात बुडालेल्या दोघा मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास केला जात आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...