Saturday, July 13, 2024
HomeनाशिकNashik Dindori News : अत्याचार प्रकरणातील पिडीतेचा मृत्यू; पोलीस कोठडीतून आरोपी फरार,...

Nashik Dindori News : अत्याचार प्रकरणातील पिडीतेचा मृत्यू; पोलीस कोठडीतून आरोपी फरार, शोध कायम

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

- Advertisement -

तालुक्यातील पिंपळणारे (Pimpalnare) येथील एका विवाहित युवकाला (Youth) लग्नाचे अमिष दाखवत एका युवतीवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने (Court) पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली होती. मात्र, चौकशीच्या दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो युवक पसार झाल्याने या प्रकरणातील पिडीत युवतीने त्यांच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे….

Asian Games 2023 : चीनमध्ये महाराष्ट्राच्या लेकाचा डंका! मराठमोळ्या अविनाश साबळेची स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) पिंपळणारे येथील प्रिया खांदवे (२०) या युवतीने गावातीलच ग्रामपंचायत सदस्य व विवाहित उमेश बंडू खांदवे (३५) या युवकाने एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत गुरुसाई लॉज दिंडोरी, ग्रीन व्हॅली लॉज वलखेड फाटा तसेच साईतीर्थ लॉज अंजनेरी (त्र्यंबकेश्‍वर) अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात लग्‍नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद (Complaint) प्रिया खांदवे हिने बुधवार (दि.२७ सप्टेंबर) रोजी दाखल केली होती.

Nashik News : “धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण…”; त्र्यंबकेश्वर, घोटीत आदिवासी समाजाचे आंदोलन

या फिर्यादीवरुन दिंडोरी पोलिसांनी (Police) सदर आरोपी उमेश खांदवे यास अटक (Arrested) केली होती. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवार (दि. ३० सप्टेंबर) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. यावेळी गुरुवार (दि. २८ सप्टेंबर) रोजी त्र्यंबकेश्‍वर येथील साईतीर्थ लॉज अंजनेरी येथे आरोपीला दिंडोरीचे पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, पो. ना. सुदाम धुमाळ हे चौकशीसाठी घेवून गेले होते. त्यावेळी चौकशी पूर्ण होऊन परत येत असतांना गंगापूर रोड येथील विसे मळा येथे आरोपीने लघुशंकेचा बहाणा करुन गाडी थांबवण्यास सांगितले.

Raj Thackeray : “आपलं कुठेतरी…”; राज ठाकरेंची सणांमधील डीजेच्या दणदणाटावर पोस्ट

यावेळी रस्त्याच्या कडेला लघुशंकेचा बहाणा करत पोलिसांच्या हाताला झटका मारुन व अंधाराचा फायदा घेत आरोपीने पोबारा केला. त्यानंतर जवळच एका विहीरीजवळ आत्महत्येचा बनाव देखील केला होता. परंतु, पोलिस चौकशीत तो प्रयत्न बनाव असल्याचे सिध्द झाले होते. त्यातच शनिवार (दि. ३० सप्टेंबर) रोजी रात्री साडे आठ वाजता प्रिया खांदवे ही घराच्यासोबत घरात झोपली होती. सकाळी चार वाजेच्या सुमारास प्रियाच्या आईला जाग आली असता प्रिया घरात नसल्याचे लक्षात आले. त्यावरुन दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर घरी गेल्यावर त्यांच्याच शेतातील विहिरीत (Well) प्रियाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Viral News : भाजप खासदाराचे महिला आमदाराशी गैरवर्तन? आधी हात पकडला नंतर…; Video व्हायरल

त्यांनतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दुधेडीया यांच्याशी संपर्क साधला असता प्रथमदर्शनी प्रियाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत असून शवविच्छेदनाचे अहवालात आत्महत्या की हत्या यासंदर्भात माहीती मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पुढील तपास दिंडोरी पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस (Dindori Police) करीत आहे. तर या घटनेतील फरार आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान दिंडोरी पोलिसांपुढे उभे ठाकले असून हे प्रकरण पोलिसांची डोकेदुखी वाढवणार असल्याची चर्चा आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी; २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच

- Advertisment -

ताज्या बातम्या