नाशिक | प्रतिनिधी
उपनगर हद्दीतील रविशंकर मार्ग भागातील महादेव सोसायटीजवळ गोळीबाराची घटना घडली. यात एक तरुण जागीच ठार झाला असून काहीतरी आपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याचे समजते.
- Advertisement -
अमोल पोपटराव काठे(रा. एकलहरा रोड) असे मृताचे नाव कळते. डोक्यात व छातीवर गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला. तो माजी सैनिक आहे. तर एक जणजखमी झाल्याचे समजते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
रात्री घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. उपनगर पोलीस तपास करत आहेत. माहिती कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.