Sunday, May 18, 2025
Homeनाशिकट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

चाळीसगाव रस्त्यावर न्यायडोंगरी गावालगत भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला.

भरधाव ट्रक क्रमांक जी.जे.13 ए.डब्ल्यू. 8002 हा नांदगावकडून चाळीसगाव कडे जात असतांंना दुचाकी क्रमांक एम.एच.41. ए.एस.9373 ला धडक दिल्याने आदेश गणपत मुकणे(32) हा युवक गंभीररित्या जखमी झाला. त्यास नागरीकांनी नांदगाव रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासणीअंती तो मृत असल्याचे घोषीत केले.

अपघातानंतर फरार झालेल्या वाहनचालक विरूध्द पोलिसांंनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि सुनील बढे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...