Sunday, October 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPrasad Lad : मोठी बातमी! आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी

Prasad Lad : मोठी बातमी! आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई । Mumbai

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा आमदार लाड यांनी केला आहे. या धमकीविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

आमदार लाड यांच्या म्हणण्यानुसार, धमकी देणा-याने “2 हजार लोकांसह हल्ला करेन,” असे म्हटले आहे. त्याचबरोबर, या व्यक्तीने कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा केला, असे आमदार लाड यांनी सांगितले.

लाड यांनी पोलिसांकडून धमकी देणा-याची चौकशी करून त्याला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कमी उस उतार्‍याचा शेतकरी, कारखान्यांना फटका!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि पोषक थंडीचा अभाव यामुळे यंदा उसाच्या वाढीवर परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका साखर उतार्‍याला बसू लागला आहे....