Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची (Death Therat) धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, धमकी देणाऱ्याने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले असून धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

तर धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी सर्व तपशील घेऊन तपास सुरू केला.

त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून (Mahad) पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलने मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित आरोपी प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापूरचा (Kolhapur) आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या