Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशदेशभरात बॉंम्बस्फोट घडवण्याचा इशारा,पुण्यात एका व्यक्तीला ई-मेलवर धमकी आल्याने खळबळ

देशभरात बॉंम्बस्फोट घडवण्याचा इशारा,पुण्यात एका व्यक्तीला ई-मेलवर धमकी आल्याने खळबळ

पुणे | Pune

पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मेलवर देशात बॉम्बस्फोट (Bomb Blast Threating E-mail) होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे.

- Advertisement -

“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो”, (Death Threat To PM Modi) असा उल्लेखही मेलद्वारे करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune) अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला. त्यामध्ये असा धमकी देणारा मजकूर होता. सोशल माध्यमांवर विदेशातून ईमेल करत एका व्यक्तीनं ही धमकी दिली होती.

अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले?; संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

एका व्यक्तीने सोशल मिडीयावर विदेशातून ई-मेल करत ही धमकी दिली होती. एम. ए. मोखीम असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ‘मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. एकीकडे पुण्यात दहशतवादी संघटनेशी संबधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच उडवून देण्याचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.

“ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले…”; हरी नरकेंच्या निधनानंतर शरद पवारांची भावून पोस्ट

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता. त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे पुण्यात दहशतवादी आढळून येत असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच उडून देण्याचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या