Saturday, May 30, 2026
Homeमुख्य बातम्या"...तर तुमचा बाबा सिद्दिकी करू"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

“…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (UP CM) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक नियंत्रण कक्षाकडे ही धमकी देण्यात आली असून ‘तुमचा बाबा सिद्दिकी करू’ असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु असून योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. असे असताना त्यांना धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसांत राजीनामा दिला नाही तर त्यांना बाबा सिद्दिकींसारखं मारू असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, हा नंबर कुणाच्या नावावर रजिस्टर आहे, मेसेज कुणी केला? मेसेज करणारे मुंबईतीलच आहेत की बाहेरचे आहेत? मेसेज करणाऱ्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहेत का? की कुणी खोडसाळपणा केला? याची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांनी (Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...