Monday, June 24, 2024
HomeनाशिकNashik Accident News : करंजाळी येथील बस-कार अपघातातील मृतांची संख्या चारवर

Nashik Accident News : करंजाळी येथील बस-कार अपघातातील मृतांची संख्या चारवर

पेठ | प्रतिनिधी | Peth

- Advertisement -

येथील नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik-Peth-Dharampur National Highway) करंजाळीजवळ (Karanjali) शुक्रवार (दि.०८ रोजी) बस आणि कारचा भीषण अपघात (Bus and Car Accident) झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला होता. तर दोघेजण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला असून करंजाळी बस अपघातातील मृतांची संख्या ४ वर पोहचली आहे…

Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच; धरणे ‘इतकी’ टक्के भरली

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) येथील चार तरुण देवदर्शनासाठी आले होते. यावेळी ते देवदर्शन करून नाशिकहून (Nashik) परतीचा प्रवास करत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वरील करंजाळी गावानजीक नाशिकहून गुजरातकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक जीजे ०६ एफसी ३३३१ हिने पेठ आगारची पेठ-पुणे बस क्रमांक एमएच ०४ वाय ५९७४ या बसला (Bus) समोरून धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, कारचे इंजिन तुटून बस खाली गेले. तर समोरील एअर बॅग फुटून चालक व पुढील सिटवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. तसेच मागील सीटवरील किसन छगनभाई वाघासीया (३२) व रविभाई प्रविणभाई दोबारीया (२६) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर चालक जैनिश मुकेशभाई सुतारीया (२४) व जयदीप लभूभाई गोयानी (३२) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले होते. मात्र, आता उपचार सुरु असतानाच दोघांचाही मृत्यू झाला आहे.

Dindori News : मनमाड, येवला, चांदवडसह निफाडकरांना दिलासा; पुणेगाव, वाघाड ओव्हरफ्लो

दरम्यान, याप्रकरणी एसटी चालक शिवानंद ताजणे यांच्या फिर्यादीवरुन कार चालक जैनिश सुतारीया यांच्याविरुद्ध भादवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्यात (Police Station) अपघाताची नोंद झाली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास पो.नि.व्ही.एस. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवा. झिरवाळ करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आंध्र प्रदेशात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा! माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; नेमकं प्रकरण काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या