Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; चौकशीसाठी SIT ची स्थापना

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; चौकशीसाठी SIT ची स्थापना

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथे अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू (Death)झाला होता. तर काही जण होर्डिंगखाली दबले गेल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर सदर दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष एसआयटी (SIT) पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

तसेच पोलिसांनी (Police) काही दिवसांपूर्वी या अनधिकृत होर्डिंगचे मालक भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्या अंतर्गत अटक (Arrested) केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली असून सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे या एसआयटीचे नेतृत्व करणार असून पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.

दरम्यान, या प्रकरणात भिंडेच्या कर्मचाऱ्यांसह आतापर्यंत सात जणांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तर या प्रकरणाच्या तपासात व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची गुन्हे शाखा (Crime Branch) मदत घेणार आहे. तर भिंडे याच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यानुसार तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या