Tuesday, May 21, 2024
Homeनगरयंदा डिसेंबरअखेरच टंचाईच्या झळा

यंदा डिसेंबरअखेरच टंचाईच्या झळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या 73 टक्केच पाऊस झालेला आहे. यामुळे आतापासून अनेक भागात पाणी टंचाई भासत आहे. ऐन दिवाळीत जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू झाले असून डिसेंबरअखेर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने तयार करण्यात येणारा जून 2024 पर्यंत टंचाईत कृती आराखडा अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसात हा आरखडा अंतिम होणार आहे.

- Advertisement -

दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत असून यातील डिसेंबरअखेर 100 नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्याची शक्यता असून त्याचा फायदा टंचाईवर मात करण्यासाठी होणार आहे. गेल्यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यात अवघा साडे सहा कोटी रुपयांचा टंचाईकृती आरखाडा तयार करण्यात आला होता. नोव्हेंबरच्या तोंडावर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या मागणीनूसार उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढील सहा ते सात महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार करत असते.

हा आरखडा तयार झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने आरखड्याला मंजूरी देण्यात येते. आराखड्यात सरकारी पाण्याचे टँकरची संख्या तालुकानिहाय निश्चित करण्यात आलेली असते. या पाण्याच्या टँकरवर किती खर्च अपेक्षीत असून त्यानूसार नियोजन करण्यात येते. यासह तात्पूत्या नळ पाणी योजना, खासगी विहीरी पाण्यासाठी अधिगृहीत करणे, नविन विंधनविहीरी, सरकारी विहीरीतून गाळ काढणे या उपाययोजनांचा टंचाई कृती आरखड्यात समावेश असतो. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामसभेच्या मागणीनूसार उन्हाळ्यात अथवा उन्हाळ्याच्या शेवटी निर्माण होणार्‍या पाणी टंचाईनूसार पाण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे नोंदवत असते.

सध्या जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात जिल्ह्याचा पुढील 30 जूनपर्यंतच्या टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील 14 पैकी 6 तालुक्यांची मागणी आलेली असून येत्या आठ दिवसात हा आरखडा अंतिम होणार आहे. त्यापूर्वीच मागील आठवड्यात पाथर्डी तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामुळे यंदा डिसेंबरअखेर टंचाईच्या झळा बसणार असल्याचे चित्र आहे.

20 ते 22 कोटींचा आराखडा ?

जिल्ह्यात यंदा संगमनेर, पाथर्डी, नगर, पारनेर यासह उत्तरेतील काही तालुक्यात पाण्याच्या टँकरची मागणी वाढणार असल्याचा अंदाज जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला आहे. यामुळे यंदाचा टंचाईचा आरखडा हा वाढणार असल्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेने आराखडा तयार केल्यानंतर बाबीनिहाय खर्चाला जिल्हाधिकारी हे मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषद संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना करणार आहे. यंदा साधारणपणे 20 ते 22 कोटी रुपयांचा टंचाई आरखडा तयार होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या