Thursday, September 19, 2024
HomeनाशिकMalegaon : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय - बंडूकाका बच्छाव

Malegaon : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय – बंडूकाका बच्छाव

पत्रकार परिषदेत दिली माहिती

- Advertisement -

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहानुसार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय आपण घेतला आहे यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याशी नवी दिल्लीत आपली चर्चा झाली आहे उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवू नाही मिळाल्यास पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा पूर्ण ताकदीनिशी प्रचार करू अशी माहिती बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आज येथे बोलताना दिली.

बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात सक्रिय होत असल्याची घोषणा केली. यावेळी रामा मिस्त्री, प्रमोद शुक्ला आदी शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते.

शिवसेना नेते सुनील बागुल, जयंत दिंडे, माजी आमदार शरद पाटील, अनिल कदम यांच्यासह खा. निलेश लंके यांनी उबाठा पक्षात सक्रिय होण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. आठ तारखेला दिल्ली येथे पक्षाच्या वतीने बोलावणे आले होते. यावेळी खा. संजय राऊत यांची भेट झाली. पक्षाशी कायम प्रामाणिक राहिल्याबद्दल तसेच तालुक्यात चांगले सामाजिक कार्य आहे त्यामुळे सक्रिय व्हावे, असे भेटीदरम्यान खा. संजय राऊत यांनी सांगितले असल्याचे बंडूकाका बच्छाव म्हणाले.

पक्षाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांचा जामीन झाल्यानंतर एकत्रित रित्या निर्णय घेण्यात येईल. पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाली किंवा ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्यांचे काम करेल असेही बंडूकाका बच्छाव यांनी यावेळी सांगितले. गेल्या काळात इतर पक्षांचे बोलावणे देखील झाले होते. परंतु हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची एकनिष्ठ राहिलो आहे. जनसामान्यांचे कार्य, करोनाकाळात सदैव तत्पर राहून गोरगरिब रुग्णांसाठी काम केले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन दोनधाम यात्रा, उमरा यात्रा वृद्धांना घडवून आणली. यामुळे जनसामान्यात आपुलकीची भावना आहे. यामुळे मी उमेदवारी करावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

मी फक्त इच्छुक उमेदवार असल्याचे वरिष्ठांना सांगितले. डॉ.अद्वय हिरे व तुम्ही एकत्रित काम करा. निवडणुकीत सक्रिय व्हा, उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा असे खा. राऊत यांनी सांगितले असल्याचे बंडूकाका बच्छाव यांनी यावेळी म्हणाले. काही दिवसात डॉ. हिरे यांचा जामीन होईल. यानंतर एकत्रित बसून पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचे काम करू व भगवा फडकवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या