Tuesday, July 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजखेळाडूंना नोकरी देण्यासाठी निकष निश्चित करण्याचा निर्णय

खेळाडूंना नोकरी देण्यासाठी निकष निश्चित करण्याचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहे. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सरकारी नोकरी देण्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विधानसभेत दिली.

महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्दे समाविष्ट करण्यात येतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जात नसल्याने मध्यंतरी महाराष्ट्रातील खेळाडूंनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी आज खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील विविध खेळांना, खेळाडूंना शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येत आहे. ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करून, पदक प्राप्त करून राज्याचा लौकिक वाढविला आहे त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या निकषांमध्ये आणखी काही मुद्दे समाविष्ट करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या