Tuesday, September 17, 2024
Homeराजकीय'मविआ'त मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

‘मविआ’त मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई । Mumbai

- Advertisement -

महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) आज विधानसभा निवडणुकीचं (Maharastra Assembly Election) रणशिंग फुंकले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत पहिल्यांदा जाहीर मेळावा आयोजित केला. मेळाव्याला सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरही मोठे वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, आजपासून पुढच्या लढाईची सुरूवात होत आहे. आताची लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची. पृथ्वीराज चव्हाण, शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करावं, कोणाच्याही नावाला माझा पाठिंबा आहे. कारण आपल्यात लढाई नको, विरोधकांशी आपल्याला लढायचं आहे.

हे हि वाचा : विदर्भात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ हाती

आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा आणि पुढे चला. भाजपसोबत असताना जागांसाठी पाडापाडी व्हायची. त्यांच्यासोबत जे घडलं ते पुन्हा नको. निवडणूक आयोगाने आजच निवडणूक जाहीर करावी. लोकसभेत राजकीय शत्रूला आपण पाणी पाडलं, तू राहशील किंवा मी राहीन अशी लढाई लढा. असं विधान उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात केले आहे.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरुन मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. तुम्ही वक्फ बोर्डाचं बिल आणलं. जाहीर विचारतो. महाराष्ट्रात तुम्ही जी समाजात आग लावली. मराठा, ओबीस आणि धनगर आरक्षण आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांचा नाही.

हे हि वाचा : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार?

तो केंद्र सरकारचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊन ही मर्यादा वाढवा. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. मराठ्यांना आरक्षण द्या, धनगरांना द्या. ओबीसींचं तसंच ठेवा. आणा बिल. आम्ही देतो पाठिंबा. पण तुम्ही आगी लावत आहात. म्हणूच तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. एक तर तू राहशील किंवा मी राहील, असे ते पुन्हा म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या