Saturday, May 4, 2024
Homeनगरबैल पोळा सणासाठी सजली बाजारपेठ

बैल पोळा सणासाठी सजली बाजारपेठ

पैठण (प्रतिनिधी)

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात असून बैलपोळ्याला सर्जा-राजाला सजवण्याठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पैठणसह इतर ठिकाणच्या बाजारपेठांमध्येे विविध साहित्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. मात्र, यंदाही करोनाच्या सावटामुळे बाजारात अजून म्हणावी तशी रेलचेल नसल्याच चित्र आहे.

- Advertisement -

शेतकरी व त्याच्यासाठी अपार कष्ट करणार्‍या बैलांचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेवला आहे. वर्षभर शेतात काम करणार्‍या सर्जा- राजांना सजवत पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्त्व पोळ्या दिवशी आहे. शेतकरी हा सण उत्साहाने व आनंदाने सर्जा-राजाचा वाजत-गाजत का नसेना मात्र उत्साहात रुढी-परंपरेने साजरा करतोच. बैलांना सजवून वाजत- गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. परंतू, गत दोन वर्षापासून करोनाच्या सावटात शासनाच्या निर्बंधात हा सण साजरा करावा लागत आहे.

बैल पोळाच्या पार्श्वभूमीवर साज सजावट साहित्याची दुकाने यंदा दहा-बारा दिवस अगोदरच उभारली गेली आहेत. करोनाचे संकट सर्व जगावर असले तरी शेतकरी मात्र सर्जा-राजाला सजवण्याची हौस पुरी करण्यात जराही काटकसर करण्याची शक्यता नाहीत. शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी अजूनही खेडोपाडी बहुतांश हौशे शेतकरी दारातील बैलजोडीचा चांगला सांभाळ करताना दिसत आहेत. बैलांना सजवण्याची व मिरवण्याची हौस शेतकरी सढळ हाताने करत आहेत.

साहित्यावर महागाईचे सावट

यंदा बैल पोळ्यासाठी लागणार्‍या बहुतांश साहित्याच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पोळ्यावर महागाईचे सावट दिसून येत आहे. बैलांना सजवण्यासाठी आवश्यक असणार्‍या पैंजण, शिंगासाठी शेंदुरी, कलर, रेबीन, चाळ, पट्टा, कासरा, शिंग गोंडे, केसारी, मणी माळा, पितळी चैन, झुली, चंडाळे, मोरक्या, व्यसनी, गुघरं, बाशिंग, कवडीमाळ, तिरंगा माळ, छमडी गोंडा माठोड कासरे, घुंगरु आदि शोभेच्या प्रमुख साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या