देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र मंदिरं आणि १२ ज्योतिर्लिंग मंदिरात देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरापैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांनी आणि पानांनी सजावट करण्यात आली आहे.
ऑरकेड, शेवंती, कामिनी, कार्नेशन अशा विविध फुलांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांबांची फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे, यासाठी तब्बल सातशे किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.
ही आकर्ष फुलांची सजावट दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र उत्साहाच वातावरण असून, पंढरपुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विविध सण, उत्सव, स्वातंत्र दिन अशा महत्त्वाच्या दिवशी देवाला विशेषरित्या सजवण्यात येते.
पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात.