Friday, May 3, 2024
Homeनाशिकमेथी, पालक आणि कोथिंबिरीच्या दरात घट

मेथी, पालक आणि कोथिंबिरीच्या दरात घट

मनमाड । बब्बू शेख Manmad

गत अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले मेथी, कािेथंबीरचे भाव जमिनीवर आले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सोबत किरकोळ बाजारात मेथी, पालकच्या एका जुडीस 8 ते 10 रुपये तर कोथिंबीरला 5 ते 7 रुपये भावात मिळत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अवघ्या पंधरा दिवसात भाव मोठया प्रमाणात घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.

- Advertisement -

भाजी बाजारात कांद्यासह मेथी, कोथंबीर आणि पालक या चार वस्तू स्वस्त झाल्या आहेत. आवक वाढल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. मेथी, पालक, कोथंबीर स्वस्त झाली असली तरी इतर भाजीपाल्याच्या भावात झालेली वाढ कायम आहे.

तीन महिन्यापुर्वी सर्वच भाजीपाल्यास कवडीमोल भाव मिळत होता. टोमॅटोचे भाव तर एक रुपया किलोवर आले होते त्यातून वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याचे पाहून अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटो फेकून दिले होते. त्यावेळी मेथी, कोथिंबीर, पालकची देखील हीच परिस्थिती होती. कांद्याच्या भावात देखील सुधारणा होवू शकलेली नाही. चांगला पाऊस पडेल आणि सुगीचे दिवस येतील असे बळीराजाला वाटत होते मात्र पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटलेला असताना मनमाडसह नांदगाव तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही त्यामुळे खरीप पिकासह भाजीपाल्याची पाहिजे तेवढी लागवड करण्यात आली नाही.

ज्या शेतकर्‍यांच्या तळ्यात आणि विहिरीना पाणी होते त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली होती त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वच भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे. आता आवक वाढली असल्यामुळे काही दिवसा पूर्वी गगनाला भिडलेले मेथी, पालक आणि कोथंबीरचे भाव जमिनीवर आले असून एक महिन्यापूर्वी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातचं नव्हे राज्यात मेथी, कािेथंबीर, पालकच्या एका जुडीला 35 ते 40 रुपये इतका भाव मिळत होता भावात वाढ झाल्यानंतर मेथी आणि कोथंबीर ने तर काही शेतकर्‍यांना थेट लखपती देखील केले आहे.मात्र आता त्याच मेथी आणि कोथिंबीरच्या भावात मोठी घसरण होऊन आज मेथीला 8 ते 10 रुपये तर कोथिंबीरला 5 ते 7 रुपये भाव मिळत आहे.अचानक भाव घसरल्यामुळे मेथी,कोथिंबीर,पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.

दोन एकरात मेथी लावली होती तिला सुमारे 30 हजार रुपये खर्च लागला होता. भाववाढ झाल्याचे पाहून आनंद झाला होता. कांद्यात झालेला तोटा मेथी भरून काढेल असे वाटत असताना अचानक मेथीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या जो भाव मिळत आहे तो पाहून लागवडीवर केलेला खर्च देखील निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

कौतिक खैरनार, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या