Friday, November 22, 2024
Homeनगरनातवाने बिबट्याच्या तावडीतून आजीची केली सुटका!

नातवाने बिबट्याच्या तावडीतून आजीची केली सुटका!

आजी गंभीर जखमी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील देवगाव येथे गवत कापत असताना पंचाहत्तर वर्षीय आजीवर बिबट्याने जीवघेणा हल्ला (Leopard Attack) केल्याची घटना रविवार दि. 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. मात्र त्याचवेळी तेथे असलेल्या नातवाने प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून आजीची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

- Advertisement -

देवगाव गावांतर्गत असलेल्या लामखडे वस्ती येथील माधव लामखडे यांची आई भीमबाई लक्ष्मण लामखडे या रविवारी सकाळी घराजवळ असलेल्या शेताजवळील रस्त्याच्या कडेला गवत कापत होत्या. त्याचवेळी ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) भीमबाई यांच्यावर अचानक हल्ला करत त्यांना ओढून चालवले होते. मात्र जवळच असलेल्या प्रसाद लामखडे या नातवाने आजीच्या दिशेने धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून आजीची सुटका केली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात भीमबाई लामखडे या गंभीर जखमी (Injured) झाल्या आहे. त्यानंतर त्यांना तातडीने औषधोपचारांसाठी संगमनेर (Sangamner) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती काही नागरिकांनी वनविभागाला दिली. त्यामुळे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांच्या सूचनेवरून वनपाल एस. एच. कोंडार, वनरक्षक राकेश कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर तातडीने परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे (Cage) लावण्यात आले आहे. याचबरोबर या घटनेची माहिती समजताच खासदार भाऊसाहेब वाकचौरे (MP Bhausaheb Wakchaure) यांनी रुग्णालयात जावून जखमी भीमबाई लामखडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस संगमनेर तालुक्यात (Sangamner) बिबट्यांचे हल्ले वाढतच चालले असल्याचे यावरून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या