Tuesday, June 17, 2025
Homeनाशिकअन्सारी रूग्णालयाचे लोकार्पण

अन्सारी रूग्णालयाचे लोकार्पण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महापालिकेतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Campaigns) सुमारे सव्वापाच कोटी रूपये खर्चून जाफरनगर भागात उभारण्यात आलेल्या हारूण अन्सारी रूग्णालयाचे (Harun Ansari Hospital) लोकार्पण करण्यात येत आहे. आरोग्यसेवेच्या दृष्टीने ही मालेगावकरांसाठी प्रजासत्ताकदिनाची अनोखी भेट असल्याचे प्रतिपादन महापौर ताहेरा शेख रशीद (Mayor Tahera Sheikh Rashid) यांनी केले.

- Advertisement -

माजी महापौर शेख रशीद यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने जाफरनगरात साकारलेल्या 30 खाटांच्या रूग्णालयास माजी आ. हारूण अन्सारी यांचे नाव देण्यात आले आहे. या रूग्णालयाच्या लोकार्पण समारंभात मार्गदर्शन करतांना महापौर ताहेरा शेख बोलत होत्या.

कार्यक्रमास उपमहापौर नीलेश आहेर, माजी महापौर शेख रशीद, सभागृहनेते अस्लम अन्सारी, स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्ला, प्रभाग सभापती अजीज मुल्ला, जे.ए.टी.कॅम्पसचे अध्यक्ष निहाल अन्सारी, आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे व इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

मालेगाव शहराच्या विकासासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करून महापौर ताहेरा शेख पुढे म्हणाल्या, शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे प्रयत्न केले जातील. जाफरनगरातील रूग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण करण्यात आले असून या रुग्णालयात 2 शस्त्रक्रिया गृह, ऑक्सीजन प्लॉन्ट व इतर सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

भविष्यात अतिदक्षता कक्षासारख्या विशेष सेवाही उपलब्ध करून दिल्या जातील. रूग्णालय नविन असल्याने जनतेने रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना सहकार्य करावे. अली अकबर व एन.एन. वाडीया रूग्णालयाचे देखील नूतनीकरण केले जात असून ही दोन्ही 100 खाटांची रुग्णालये सर्व सुविधांसह नागरिकांच्या सेवार्थ लवकरच कार्यान्वीत होणार आहेत. याशिवाय द्याने व कॅम्प भागातही मनपा रूग्णालयांची कामे सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी म्हणाले की, आपल्याकडे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यभार असतांना आरोग्य सुविधांसांठी 15 ते 20 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता घेतली व टप्प्याटप्याने काम होत आहे. याच रुग्णालयाच्या मागील बाजूस ऑक्सीजन प्लॉन्टचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी 80 ते 90 लक्ष रूपये खर्च करण्यात आला असून या ऑक्सीजन प्लॉन्टमुळे कायमस्वरूपी महापालिकेस 1600 जम्बो सिलेंडर मिळणार आहेत.

आर.टी.पी.सी.आर. लॅबच्या मशिनरीही आलेल्या असून 15 दिवसात आर.टी.पी.सी.आर. लॅब सुरू करण्यात येईल. पॅथॉलॉजी तपासणीसाठी बाहेर 2500 रुपये लागतात, तेच मनपाच्या जनरल पॅथॉलॉजी लॅबमध्ये केल्यास 500 ते 1 हजार रुपयात सर्व तपासणी उपलब्ध करून देवू शकतो. यासाठी महापालिकेची जनरल पॅथॉलॉजीकल लॅब उभारण्यात येणार असून त्याकरीता 50 ते 60 लक्ष रकमेचे मशीन खरेदी केले आहे, असेही आयुक्त गोसावी यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, माजी महापौर शेख रशीद, उपायुक्त राजू खैरनार, जेएटी कॅम्पसचे विश्वस्त निहाल अन्सारी यांनीही मार्गदर्शन केले.

जाफरनगर रूग्णालयास आपल्याच महापौरपदाच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता मिळाली व रूग्णालयास हारूण अन्सारी यांचे नाव देण्याचा निर्णयही महासभेत एकमताने घेतला गेला. त्यास कुणीही विरोध केला नाही. हारूण अन्सारी यांचे अनेक राजकीय शिष्य असून आपणही त्याचेच शिष्य म्हणून त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या वाटेने मार्गक्रमण करीत आहोत. या रूग्णालयास त्यांचे नाव देत एकप्रकारे आपण कृतज्ञतार्पूक गुरूदक्षिणाच अर्पण करीत आहोत.

शेख रशीद माजी महापौर, मालेगाव

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...