पुणे | Pune
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी १० लाख रूपये रक्कम आगाऊ मागितले. मात्र, तीन लाख रूपये देतो, असे सांगूनही तनिषा भिसे, या महिलेवर उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सरकारने नेमलेल्या समितीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात ठपका ठेवला आहे. यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची सर्वत्र टीका होत असताना रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. धनंजय केळकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मात्र, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच त्यांनी आज पत्रकार परिषद गुंडाळली.
भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते का? डॉक्टर अशा पद्धतीने डिपॉझिट भरण्यास सांगू शकतात का? असे प्रश्न डॉ. धनंजय केळकर यांना विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले,‘डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्याकडे नाही. डॉक्टरांच्या काय डोक्यात आले आणि त्यांनी १० लाख रूपये मागितले, असे उत्तर धनंजय केळकर यांनी दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. रुग्णालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिले जाते. त्यावरही डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू काय डोक्यात मध्ये आला, डॉ. घैसास यांनी चौकोनात १० लाखांचे डिपॉझिट लिहिले. ही गोष्ट खरी आहे. पण यापैकी (उपस्थित डॉक्टर) तुम्ही कोणालाही विचारू शकता, डॉक्टरांकडून अनामत रक्कम मागितली जात नाही. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असे लिहून दिले नाही”, असे डॉ. धनंजय केळकर यांनी स्पष्टीकरण दिले.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची व्याप्ती व गंभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ हा राजीनामा स्विकारतील, असे केळकर म्हणाले. दरम्यान, मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. मी दडपणाखाली वावरत आहे. तसेच समाजमाध्यमांवर माझ्यावर कठोर टीका देखील होत आहे. यामुळे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे डॉ. घैसास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. केळकर म्हणाले. यामध्ये कुठेही रुग्णालयाची बदनामी नको म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे डॉ.घैसास यांनी सांगितल्याचे केळकर म्हणाले.
धनंजय केळकर म्हणाले, “सुश्रुत घैसास हे रूग्णालयात कन्सल्टंट म्हणून होते. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. पण, डिपॉझिट घेण्याची व्यवस्था काढून टाकली आहे. रूग्णालयातील कर्मचारी अधिक काम करत असल्याने मदत करण्याची वृत्ती कमी होती.”
“जे रूग्णालय डिपॉझिट भरू शकतात, त्यांच्याकडून पैसे घेतले गेले. आता रूग्णालय डिपॉझिट स्वीकारणार नाही. महापालिकेचा एकही रूपयांचा टॅक्स थकला नाही. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्याकडे नाही. डॉक्टरांच्या काय डोक्यात आले आणि त्यांनी 10 लाख रूपये मागितले,” असे धनंजय केळकर यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा