नाशिक | Nashik
महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या (Nashik Mahavitrana) मुख्य अभियंतापदी मुख्य कार्यालयाच्या बदली आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेले दिपक कुमठेकर (Dipak Kumthekar) यांनी शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी मुख्य अभियंता (Chief Engineer) पदाचा पदभार स्वीकारला…
यापूर्वी ते जळगाव परिमंडळाचे (Jalgoan Parimandal) मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते. नाशिक परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सुध्दा मार्च महिन्यापासून त्यांच्याकडेचं होता.
यापूर्वी सुद्धा त्यांनी नाशिक परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी कार्य केले आहे. रुजू झाल्यानंतर अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, विविध विभाग प्रमुख, कर्मचारी आणि सर्व संघटना यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नाशिक परिमंडलातील वीज ग्राहकांना (MSEB Customer) अखंडित व सर्वोत्कृष्ठ सेवा देण्याबरोबर महावितरणच्या विविध योजनांची व सेवांची गतिमान अंमलबजावणी करणे आणि हे उद्दीष्ठ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.