Tuesday, June 16, 2026
HomeमनोरंजनDeepika Padukone And Ranveer Singh : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह झाले...

Deepika Padukone And Ranveer Singh : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह झाले आई-बाबा, गणेशोत्सवात चिमुकलीचं आगमन

मुंबई | Mumbai

बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या (Deepika Padukone And Ranveer Singh Welcome A Baby Girl) घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. दिपीकाने आज मुलीला जम्न दिला आहे.

- Advertisement -

गणपतीच्या मुहूर्तावर दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मीचा जम्न झाला आहे. दीपिका पादुकोणननं फेब्रुवारी महिन्यात ती आई आणि रणवीर बाबा होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. तेव्हा पासून दोघांच्याही चाहतावर्गात कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता.

काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता ते आईबाबा झाले आहेत. दीपिकाने त्यांच्या पहिल्या लेकीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्माने दीपिका-रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दीपिकाने गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गोंडस लेकीला जन्म दिला. गणेश चतुर्थीला रणवीर आणि दीपिका सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर दीपिकाला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...