Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशचीनी DeepSeek मुळे अमेरिकन शेअर बाजारात दाणादाण!

चीनी DeepSeek मुळे अमेरिकन शेअर बाजारात दाणादाण!

भारतीय शेअर बाजार काही दिवसांपासून सतत घसरणीचा सामना करत आहे. गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या असताना, आता अमेरिकन शेअर बाजारातही मोठा घसरण पाहायला मिळते आहे.

या घडामोडींचं कारण ठरलय चीनचं नव्याने सादर झालेलं DeepSeek AI नावाचं तंत्रज्ञान. चीनच्या स्टार्टअप कंपनीने अतिशय कमी किंमतीत एआय मॉडेल तयार केल्याची समजताच शेअर बाजारात हाहाकार उडाला. अमेरिकी टेक कंपन्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. याच बरोबरच जगातील अनेक अब्जाधीशांची संपत्तीही झटक्यात कमी झाली.

- Advertisement -

सोमवारी डीपसीक लाँच झाल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात अक्षरश: उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. एनविडियाच्या शेअर्सनं गेल्या चार महिन्यांतली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण नोंदवली. त्यामुळे कंपनीचं तब्बल ६०० बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. त्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा वरचष्मा असणाऱ्या नॅसडॅक (Nasdaq) शेअर बाजारात तीन टक्क्यांहून मोठी घसरण पाहायला मिळाली.

DeepSeek चा शोध कुणी लावला ?

डीपसीक या एआय स्टार्टअपची स्थापना हेज फंड आणि एआय इंट्रस्ट्रीजमधील प्रमुख लिआंग वेनफेंग यांनी स्थापन केलीय. वर्षापूर्वीच हे स्टॉर्टअप स्थापन झालेले आहे. या DeepSeek AI च्या टीममध्ये मुख्यत्वे चिनी विद्यापीठातील तरुण, हुशार पदवीधरांचा समावेश होता. गेल्याच आठवड्यात डीपसीक हे AI मॉडेल लाँच केले गेले. डीपसीकची एआय सेवा सुरू झाल्यानंतर chatgpt पेक्षा जास्त त्याचे डाउनलोड झाले आहेत.

विशेष म्हणजे अमेरिकेतील मोठी स्वॉफ्टवेअर कंपनी निविडाच्या (Nvidia) चिप्सशिवाय हे एआय तयार झाले. ते पण फक्त 15-20 दशलक्ष डॉलर्स खर्चात. Google, meta, Microsoft ने लाँच केलेल्या AI संशोधनासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च झालाय. या एआयमध्ये हाय लेवल हार्डवेयर वापरले गेलेले नाहीत. तसेच ओपन सोर्स टेक्नोलॉजीचा वापर केलाय. कमी खर्चात तयार झालेल्या या एआयमुळे अमेरिकेतील कंपन्या आणि त्यांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी DeepSeek तंत्रज्ञानाला अमेरिकेतील उद्योगांसाठीचा इशारा असल्याचं म्हटलं आहे. पण त्याचवेळी ही सकारात्मक बाबदेखील असल्याचं ते म्हणाले. “हा आपल्याकडच्या उद्योगांसाठी इशारा आहे. कारण आता आपण या क्षेत्रात स्पर्धा करून जिंकण्यावर अधिक जोर देण्याची गरज अधोरेखित झाली”, असं ट्रम्प म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...