Tuesday, July 16, 2024
Homeजळगावआ.एकनाथराव खडसे बदनामीप्रकरणी भाजप आमदारा विरूध्द मानहानीचा दावा

आ.एकनाथराव खडसे बदनामीप्रकरणी भाजप आमदारा विरूध्द मानहानीचा दावा

जळगाव – प्रतिनिधी jalgaon

- Advertisement -

चाळीसगावचे भाजप (bjp) आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी बदनामीकारक वक्तव्य करून समाजात बदनामी केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात आ.मंगेश चव्हाण यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.

या खटल्याच्या सुनावणीसाठी स्वत: एकनाथ खडसे शनिवारी जळगाव न्यायालयात दाखल झाले होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले कोणतेही वितुष्ट नसताना त्यांनी आपली समाजात बदनामी केल्याचा युक्तीवाद एकनाथराव खडसे यांनी न्यायालयात केला. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल होता, यात तडजोड झाली होती, याला काही दिवस उलटत नाही तोच आमदार खडसे यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात जळगाव जिल्हा न्यायालया फौजदारी खटला दाखल केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या