Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्याराणेंच्या अडचणी वाढणार? राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

राणेंच्या अडचणी वाढणार? राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

मुंबई | Mumbai

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नोटिशीबाबत ट्विटरवरुन संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना खासदार बनवले आणि त्यासाठी मी पैसा खर्च केला, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००४ मध्ये आपल्याला संजय राऊत यांना खासदार बनविण्यास सांगितले होते. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यालाच खासदार बनवायचे होते. पण बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी संजय राऊत यांचा अर्ज भरून घेतला होता. निवडणुकीच्या यादीत त्यांचे नाव देखील नव्हते, असा दावा नारायण राणे यांनी अलीकडेच केला आहे.

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष जुना आहे. नारायण राणे हे एकेकाळचे कट्टर शिवसैक. बाळासाहेब ठाकरे यांच्या वरदहस्ताने ते मुख्यमंत्री पदापर्यंतही पोहोचले. पण, पुढे काही कारणावरुन त्यांचे बाळासाहेब ठकरे यांच्या हायातीतच शिवसेनेशी बिनसले. त्यातून त्यांनी शिवसेना सोडली. त्यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना आणि राणे यांच्यातून विस्तवही जात नाही. आता ते भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये असलेल्या राणे पितापुत्रांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या