Tuesday, May 21, 2024
Homeजळगाव..तर दिल्लीत सर्वसमावेशक साहित्य संमेलन घेणार - चोरडीया

..तर दिल्लीत सर्वसमावेशक साहित्य संमेलन घेणार – चोरडीया

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक की,दिल्ली येथे घेण्यासंदर्भात सद्या विवाद सुरु आहे. नाशिक येथे संमेलन झाले काय की, दिल्ली येथे झाले काय?याचा फारसा परिणाम होणार नाही.

- Advertisement -

मात्र दिल्लीत 94वे मराठी भाषिकांचे संगठण मजबूत करण्यासाठी मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणे सांस्कतिक आणि व्यवहारिकदृष्टया महत्वाचे असल्याचे मत दिल्लीच्या सरहद संस्थेचे अविनाश चोरडिया यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

गेल्या दीड वर्षापासून साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे. जर साहित्य संमेलन दिल्लीत न झाल्यास आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वसमावेशक साहित्य संमेलन घेण्याचा निश्चय चोरडिया यांनी व्यक्त केला.

दिल्लीत मराठी माणूस असूनही हिंदी बोलतो.त्यामुळे त्याठिकाणी मराठी भाषिकांचे संगठन होवू शकले नाही.गेल्या तीस वर्षापासून दिल्लीत व्यवसायानिमित्त राहत असल्यामुळे आणि विविध सामाजिक कार्यात सक्रीय असल्यामुळे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्याचे काम आम्ही करीत असल्याचे चोरडिया यांनी नमूद केले.

मराठी भाषेबद्दल प्रेम आहे.मी स्वत:हा जैन आहे.जैन समाजाची भाषा प्राकृतिक आहे.असे असतानाही केवळ मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि आणि दिल्लीकरांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन व्हावे अपेक्षा चोरडिया यांनी व्यक्त केली.

मी राजकीय माणूस नाही मात्र साहित्य संमेलनासाठी शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायला तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दीड वर्षापासून पाठपुरावा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे यासाठी गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे.त्यामुळे संमेलन दिल्लीतच व्हावे अशी अपेक्षा आहे.नाशिकमध्ये झाले तरी चालेल पण दिल्लीत झाले तर चांगलेच होईल असेही चोरडिया यांनी सांगितले.

मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहे.त्यामुळे जर काही कारणास्तव दिल्लीत संमेलन होऊ शकले नाही तर स्वतंत्ररित्या सर्व भाषिकांसाठी आणि साहित्यातील सर्व वाड्मय प्रकाराच्या अनुषंगाने दिल्लीत सर्वसमावेशक साहित्य संमेलन घेणार असल्याचा अविनाश चोरडिया यांनी निश्चय यावेळी केला.प्रारंभी मल्टी मीडिया प्रा.लि.चे सीईओ सुशिल नवाल आणि जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी अविनाश चोरडिया यांचे स्वागत केले.

दिल्लीतील मराठी भाषिकांची ताकद वाढेल

मुळचे पुण्याचे आणि 30 वर्षापासून दिल्लीत स्थायीक झालेले सरहद संस्थेचे अविनाश चोरडिया हे जळगावात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते.

अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित झाले आहे.मात्र हे संमेलन नाशिक की,दिल्ली असा वाद सुरु आहे.खरं तर हा वादाचा मुद्दाच नाही.

आम्हाला वाद करायचे देखील नाही.संवाद साधून आणि समन्वय साधून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे चोरडिया यांनी स्पष्ट केले.खासदार शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत.

दिल्ली ही राजधानी आहे.त्यामुळे साहित्य संमेलन दिल्लीत झाले पाहिजे असे आमचे मत आहे.

जेणे करुन दिल्लीत मराठी भाषिकांची ताकद वाढेल आणि दिल्लीतील मराठी भाषिक यानिमित्ताने एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या