Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेश'दिल्ली बनेगा...'; जी-२० परिषदे आधी दिल्लीच्या मेट्रो स्टेशनबाहेर खलिस्तान्यांच्या भारत विरोधी घोषणा

‘दिल्ली बनेगा…’; जी-२० परिषदे आधी दिल्लीच्या मेट्रो स्टेशनबाहेर खलिस्तान्यांच्या भारत विरोधी घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीत G-२० शिखर परिषदेची (G-20 Summit) तयारी जोरात सुरू असून, अनेक परदेशी पाहुणे राजधानी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे. राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था असताना दिल्लीच्या अनेक मेट्रो स्टेशच्या (Delhi Metro Stations) भिंतींवर काळ्या रंगात भारत विरोधी आणि खलिस्तानच्या समर्थनात (India anti Khalistan pro Slogans) घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित लोकांनी मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर खलिस्तान जिंदाबाद आणि पंजाब इज नॉट इंडियाच्या घोषणा लिहिलेल्या घोषणा लिहिण्यात आल्या. खलिस्तान समर्थकांनी शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, इंडस्ट्री सिटी, महाराजा सूरजमल स्टेडियम, सरकारी सर्वोदय बाल विद्यालय नांगलोई, पंजाबी बाग आणि नांगलोई मेट्रो स्टेशनवर या घोषणा लिहिल्या आहेत.

चांद्रयान-३ नंतर इस्रोची पुढची मोहिम; इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली माहिती

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, जी-२० संमेलनाच्या आधी शीख फॉर जस्टिसने (SFJ) दिल्ली मेट्रो स्टेशनांवरील रॉ फुटेज जारी केलाय. मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनात घोषणा देण्यात आले आहेत. फुटेजमध्ये दिल्लीतील मेट्रो स्टेशन शिवाजी पार्क ते पंजाबी बाग पर्यंत एसएफजे कार्यकर्ते खलिस्तान समर्थनार्थ घोषणा देताना दिसत आहेत.

दरम्यान, माहिती मिळताच मेट्रो पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ठिकठिकाणी लिहिलेल्या घोषणा हटवल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मेट्रो पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेलही या प्रकरणी सक्रिय झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेनंतर सिख फॉर जस्टिसचा फरार दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये अनेक मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर नारे लिहिलेले दिसत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या