Monday, April 28, 2025
Homeक्रीडाआयपीएल १३ : सुपरकिंग्जसमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान

आयपीएल १३ : सुपरकिंग्जसमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान

मुंबई । Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएल २०२० आज शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर सायंकाळी ७:३० करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आपल्या सलामी सामन्यात किंग्ज इलेवहन पंजाबवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतील आपली विजयी मोहीम कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे.

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सविरुद्ध शारजा लढतीत पराभव पत्करल्यानंतर आपली विजयी लय परत मिळवण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज उत्सुक आहे. चेन्नई आणि दिल्ली यांच्यात झालेल्या २१ सामन्यांमध्ये १५ लढतीत चेन्नईला विजय संपादन करता आला आहे तर ६ लढती दिल्लीने जिंकल्या आहेत.

चेन्नई संघासाठी डोकेदुखी म्हणजे शेन वॉटसन आणि मुरली विजय सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार धोनीलाही आपल्या अपेक्षेनुसार मोठी खेळी करता आलेली नाही. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे. तर राजस्थानविरुद्ध लढतीत चेन्नईच्या गोलंदाजांनी निराशा केली होती.

दिल्ली संघाबद्दल बोलायचे झाले तर, सलामी सामन्यात धवन , पृथ्वी शॉ , रिषभ पंत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. पण गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे पंजाबला विजयापासून रोखण्यात दिल्लीला यश मिळाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...