Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाविजयी चौकार मारण्यासाठी पंजाबचे किंग्ज सज्ज

विजयी चौकार मारण्यासाठी पंजाबचे किंग्ज सज्ज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये आज मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला आठवा विजय निश्चित करून प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दिल्ली उत्सुक आहे.

तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला पंजाब संघ दिल्लीवर मात करून विजयी चौकार मारून पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे. हा सामना पंजाब संघासाठी करा वा मरा असा असणार आहे.

दिल्ली संघासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतीतून सावरला आहे. त्याला अजिंक्य रहाणेच्या जागी संधी दिली जाऊ शकते. शिवाय अलेक्स केरीच्या जागी शिमरॉन हेटमायरला स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

पंजाब संघासाठी जमेची बाजू म्हणजे गेल, लोकेश राहुल, मयंक अगरवाल चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे.

अष्टपैलू ग्लेन मॅक्स्वेलला अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे. शिवाय गोलंदाजीत मोहंमद शमी , मुरुगन अश्विन , रवी बिष्णोई , चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना इतर गोलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे.

दिल्ली संघाबद्दल सांगायचे झाले तर सलामीवीर शिखर धवन अजूनही धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. असे वाटत होते. पण मुंबईविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून आपण लयीत परतलो असल्याचे त्याने दाखवून दिले होते.

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...