Monday, April 28, 2025
Homeक्रीडाविजयी चौकारासाठी बंगळूर दिल्ली सज्ज

विजयी चौकारासाठी बंगळूर दिल्ली सज्ज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये आज सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हा सामना जिंकून विजयी चौकारासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली संघ ६ गुणांसह दुसऱ्या तर बंगळूर तिसऱ्या स्थानावर आहे.

आता आजच्या सामन्यात विजय संपादन करून अव्वल स्थान मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ फॉर्मात आहेत त्यामुळे एक रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि बंगळूर यांच्यात आतापर्यंत झालेल्या २३ सामन्यांमध्ये ८ सामने जिंकले आहेत तर १४ सामन्यांमध्ये बंगळूरचा विजय झाला आहे.

दिल्ली संघासाठी जमेची बाजू म्हणजे पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर फॉर्मात असून त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. दिल्ली संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर शिखर धवन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याला आपली कामगिरी उंचावण्याची संधी मिळणार आहे.

बंगळूर संघाच्या फलंदाजीची मदार देवदूत पडिकल, विराट कोहली, एरन फिंच एबीडी, पार्थिव पटेल जोश फिलिप यांच्यावर असणार आहे.

अष्टपैलूंमध्ये मोईन अली, क्रिस मॉरिस, पवन नेगी शिवम दुबे आहेत . गोलंदाजीत युझवेन्द्र चहल, इसरू उडाना, डेल स्टेन, मोहंमद सिराज, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर नवदीप सेनी आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...