Sunday, November 17, 2024
Homeदेश विदेशदिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवालांकडून 'या' महिलेला संधी

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवालांकडून ‘या’ महिलेला संधी

नवी दिल्ली | New Delhi

मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर जामीनावर बाहेर येताच केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Chief Minister Resignation) देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, दिल्लीत (Delhi) राजकीय मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. विधानसभा निडणुकांपूर्वीच केजरीवाल यांनी मुख्यंत्रीपदाचा दिलेल्या राजीनाम्याने राजकारणात खळबळ उडून दिली होती. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहे असा आरोप केला जात होता.

- Advertisement -

अखेर केजरीवाल यांनी आरोप प्रत्यारोपाची ठिणगी विजवली आहे. केजरीवाल यांनी आपल्या पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी (Atishi Marlena) यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. मंत्री आतिशी ह्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री (Delhi CM) होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शीला दीक्षित यांच्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत.

दिल्ली मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या आतिशी (Atishi) यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तसा प्रस्तावही सादर केला आहे. त्यानुसार 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात (Convention) नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या