Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशBatla House Encounter : आरिझ खानला फाशीची शिक्षा

Batla House Encounter : आरिझ खानला फाशीची शिक्षा

नवी दिल्ली

दिल्लीत सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस एनकाउंटर (Batla House Encounter) प्रकरणी दिल्ली न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी ही शिक्षा सुनावली आहे. साकेत कोर्टाने याला दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण मानले आहे.

- Advertisement -

‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या खान याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. पोलिसांनी सांगितले की हे केवळ खुनाचे प्रकरण नाही तर न्यायाचे रक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या खुनाची घटना आहे. आरिज खानच्या वकिलांनी फाशीच्या शिक्षेस विरोध केला होता.

मागील सुनावणीत न्यायालयाने आरिझ खानला दोषी ठरवले होते. दिल्ली पोलिसांनी त्याला २०१८ मध्ये अटक केली होती. २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणानंतर आरिझ फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. आरिझ खानला बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये जीव गमवावा लागलेल्या पोलीस निरीक्षक मोहन शर्माच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच, पोलीस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांना देखील त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या