मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर केला आहे.
दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जॅकलिनला जामीन मंजूर केला आहे.
तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय जॅकलिनला देश सोडता येणार नाहीये.
सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आल्यानंतर ती अडचणीत आली आहे.
ईडीकडून अभिनेत्रीच्या अंतरिम जामिनाला विरोध करताना तिच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते.
जॅकलिन फर्नांडिसने २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट केल्याचेही म्हणण्यात आले होते.
तसेच, एजन्सीच्या अहवालात असा दावाही करण्यात आला होता की, अभिनेत्रीने या तपासादरम्यान आपण इतरांना या पुराव्यांशी छेडछाड करण्यास सांगितले असल्याची कबुली ईडीकडे दिली होती.
या प्रकरणी जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून पुढील सुनावणीपर्यंत जॅकलिन फर्नांडिस जामीन मुदतीत वाढ केली आहे.