Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशदिल्लीही महाराष्ट्राच्या मार्गावर; विकेण्ड कर्फ्यूची घोषणा

दिल्लीही महाराष्ट्राच्या मार्गावर; विकेण्ड कर्फ्यूची घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

- Advertisement -

करोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामुळे आता दिल्लीदेखिल करोना रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या मार्गावर आहे. त्यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

करोनाचा विस्फोट! भारतात दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्लीत बुधवारी सर्वाधिक १७ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चाकं दिल्लीसाठी चिंतेची बाब असून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा राज्याला फटका बसला आहे. बुधवारी १०० रुग्णांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर १२.४ वरुन १६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत सध्याच्या घडीला ५० हजार ७३६ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या