Thursday, May 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी दिलासा; उच्च न्यायालयाने 'या' प्रकरणातली याचिका फेटाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलासा; उच्च न्यायालयाने ‘या’ प्रकरणातली याचिका फेटाळली

नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका प्रकरणात मोठा दिलासा दिलाय. मोदींवर ६ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी(Ban for 6 years petetion), अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ही याचिका फेटाळून लावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.पंतप्रधान मोदींवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात प्रकरण प्रलंबित असताना न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देवी देवतांच्या नावांवर मत मागितल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.

- Advertisement -

वकील आनंद एस जोंधळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत उत्तर प्रदेशात निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. पंतप्रधानांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आधीच ठरवून टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयही निवडणूक आयोगाला कोणत्याही तक्रारीवर विशेष मत घेण्याचे निर्देश देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या