Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDelhi Building Collapse : पाच मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू; ३ ...

Delhi Building Collapse : पाच मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू; ३ विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) मोतीबाग परिसराजवळील सत्य निकेतन येथे आज (रविवारी) एक पाच मजली इमारत अचानक कोसळली. (Building Collapse) या भीषण दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला असून ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. कोसळलेल्या इमारतीखाली अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुट्टी असल्याने इमारतीमध्ये होती गर्दी

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत ४० ते ४५ लोक उपस्थित होते. सुट्टीचा दिवस असल्याने इमारतीत विद्यार्थ्यांची (Student) संख्या जास्त होती. ३० ते ३५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्ली विद्यापीठाचा ‘साउथ कॅम्पस’ या परिसराजवळ असल्याने अनेक विद्यार्थी या इमारतीत भाड्याने राहत होते. ही इमारत आनंद बन्सल यांच्या मालकीची आहे.

युद्धपातळीवर मदत व बचावकार्य

दुर्घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशमन दल (DFS) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) पथके घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांच्या आगमनापूर्वीच उपलब्ध साधनांच्या साहाय्याने ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. तर काँग्रेसची (Congress) विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’चे (NSUI) कार्यकर्तेही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू असून ढिगाऱ्याखालून काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon घरात खेळत असतांना पाणी तापवण्याच्या हिटरचा स्पर्श झाल्याने ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील साकुरी येथे ही...