Thursday, May 16, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अमित शाहांचा 'तो' व्हिडिओ भोवणार

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ भोवणार

दिल्ली पोलिसांनी बजावली नोटीस

नवी दिल्ली | New Delhi

ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंध रेड्डी (CM Revanth Reddy) यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे रेड्डी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा एक व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट करुन तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रेवंथ रेड्डी यांना नोटीस बजावली असून १ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच सोबत येताना व्हिडीओ एडिटशी संबधित असलेला मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील घेऊन येण्यास सांगितले आहे. याशिवाय ज्यांचा व्हिडीओ एडिटशी संबंध आहे त्यांना देखील चौकशीसाठी घेऊन येण्याचे आदेश दिल्ली पोलिसांनी रेड्डी यांना दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात याआधीच एकाला आसाममधून अटक केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरक्षणाबाबत (Reservation) अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ कॉंग्रेसच्या नेत्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर रेड्डी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर टीका केली होती. यानंतर भाजप आणि गृहमंत्रालयाकडून दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आज रेड्डी यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. त्यामध्ये १४ मिनिटे ३० सेकंदानंतर शाह हे मुस्लिम आरक्षणाबाबत बोलताना दिसत आहेत. यात ते म्हणतात की, “भाजप सत्तेवर आल्यास आम्ही हे असंवैधानिक मुस्लिम आरक्षण संपवू. तेलंगणातील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना ज्या संधी मिळाव्यात, त्याच संधी मुस्लिम आरक्षण संपवून त्यांना दिल्या जातील”, असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. मात्र, सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात आणू असे अमित शहा यांनी संपूर्ण भाषणात कुठेही म्हटलेले नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या