Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमShirdi : दिल्ली-शिर्डी विमानात एअर होस्टेसचा विनयभंग

Shirdi : दिल्ली-शिर्डी विमानात एअर होस्टेसचा विनयभंग

मद्यधुंद प्रवाशावर गुन्हा दाखल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

दिल्लीहून शिर्डीला येणार्‍या विमानात (Delhi Shirdi Flight) एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग (Air Hostess Molested) केल्याची धक्कादायक घटना घडली. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईट क्रमांक 6A 6403 मध्ये घडली. विमान (Plane) शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहाता पोलिसांनी (Rahata Police) आरोपी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रवाशी लष्करी जवान असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित एअर होस्टेस मूळची केरळमधील (Kerala) कोचीन येथील आहे. शुक्रवारी 2 मे रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटे ते 4 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान दिल्ली ते शिर्डी या विमानाच्या (Delhi to Shirdi Flight) प्रवासादरम्यान ही घटना घडली. आरोपी प्रवासी संदीप सुमेर सिंग याने एअर होस्टेसला दोन वेळा जाणीवपूर्वक स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीचे कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे रा. लोणी यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये (Rahata Police Station) फिर्याद दाखल केली.

YouTube video player

फिर्यादीनुसार पीडित एअर होस्टेसने याबाबत लेखी तक्रार दिली असून, आरोपी संदीप सुमेर सिंग (रा. गालड, चुरू, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354 (विनयभंग) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पेटारे करत आहेत. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...