Monday, July 8, 2024
Homeनाशिकमुंबईत मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब- उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबईत मतदानासाठी जाणीवपूर्वक विलंब- उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मात्र, मुंबईतील मतदान प्रक्रिया पार पडत असताना मतदानासाठी विलंब लागत असल्याच्या तक्रारी ठाकरे गटाकडे आल्या. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन संथगतीने सुरु असलेल्या मतदानाबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले.

शिवसेना ठाकरे गटाला जेथे मतदान मिळणार आहे किंवा आघाडी मिळत आहे, अशा ठिकाणी मतदानाला विलंब लावला जात आहे. त्यामुळे मतदारांनी जाणीवपूर्वक विलंब लावणाऱ्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची नावे घेऊन त्याची माहिती जवळच्या शिवसेना शाखेत द्यावी. मतदानासाठी विलंब लावणाऱ्या या प्रतिनिधींची नावे आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करू. तसेच याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे : फडणवीस
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच उत्तर दिले. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे पंतप्रधान मोदींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या