जुने नाशिक | Nashik
पवित्र हज व उमराह यात्रेच्या नावे शेकडो भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या संशयितांना तात्काळ अटक करावी अशी मागणी हज उमराह यात्रा कृती समितीने आयुक्त दीपक पांडेय यांना निवेदन देऊन केली आहे.
- Advertisement -
कोट्यवधी ची फसवणुकीचा प्रकार दोन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. यात जिल्ह्यातील सुमारे १३०० नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. अद्याप आरोपींवर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यावेळी समितीचे अजीज पठाण, जमीर शेख, जहीर शेख, इसहाक कुरेशी, डॉ. अस्लम पठाण, एजाज शेख आदी उपस्थित होते.
जहान इंटर नॅशनल टूरचा मालक अब्दुल मतीन मणियार व इतर संशयितांनी हज व उमराहच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी मुंबई नाका पोलीस ठाण्यात व गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.