Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकदारूचे अड्डे बंद करण्याची मागणी; महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची मागणी

दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी; महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची मागणी

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) चाचडगाव व परिसरातील अनधिकृत देशी दारूचे अड्डे (Indigenous liquor dens) तात्काळ बंद करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Mahila Sena) पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ (Police Inspector Pramod Wagh) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव (chachadgaon) गावातील गंगासागर व पटेल ढाबा या दोन अनधिकृत देशी दारूच्या अड्ड्यांमुळे तालुक्यातील चाचडगाव व पंचक्रोशीतील अनेक गावांतील पुरुष वर्ग व्यसनाच्या आधीन झाला आहे. सदर भागात प्रामुख्याने आदिवासी (tribal community) व शेतमजुरांची वस्ती असून हातावर पोट असलेल्या ह्या कुटुंबांवर दारूच्या या व्यसनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

या अड्ड्यांमुळे 15 ते 16 वर्षांची लहान लहान मुलेही दारूच्या आहारी गेली असून आसपासच्या परिसरातील महिला वर्गाची छेड काढणे, अर्वाच्य शिवीगाळ करणे, मारहाण करणे सारखे प्रकार वाढत असून महिला वर्ग प्रचंड दहशतीच्या छायेत वावरत आहे. दारूच्या या अड्ड्यांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे त्वरीत चाचडगाव येथील अनधिकृत देशी दारूचे अड्डे तात्काळ बंद करून परिसरातील नागरिक व महिला वर्गास दिलासा द्यावा, अन्यथा या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन (agitation) उभारण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या (Maharashtra Navnirman Mahila Sena) वतीने दिला आहे.

निवेदनावर (memorandum) महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा पद्मिनी वारे, कामिनी दोंदे, मनसेचे उपजिल्हाप्रमुख मनोज ढिकले, दिंडोरी तालुकाध्यक्ष अमोल उगले, पेठ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, शाखाध्यक्ष बाळू उदार, मीना गांगोडे, अलका गांगोडे, मंगल गांगोडे, सुकाबाई गांगुर्डे, सुमन मोरे, माया गांगुर्डे, सुमन तुंबडे, जीजा गांगरे, मंगला बोके, संगीता वटाणे, ताराबाई मोरे, अलका मोरे, विमल गांगुर्डे, सिताबाई उदार, रोहिणी गावंदे, पुष्पा गावंडे, चित्रा उदार, बेबी उदार, आशा गांगोडे, विमल गांगोडे, ललिता चौधरी, बेबी उदार, इंदुबाई गावंडे आदींसह सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या