Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामेटेंचा अपघात की घातपात?

मेटेंचा अपघात की घातपात?

मुंबई | Mumbai

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा आज सकाळी भीषण अपघात झाला. यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या अपघाताबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समाजाचे झालेले नुकसान आम्ही शब्दात सांगू शकत नाही मात्र हा अपघात झाला की घातपात झाला, असा संशय व्यक्त त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी केली आहे.

विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे सहकारी एकनाथ कदम हे त्या दुर्घटनाग्रस्त गाडीत उपस्थित होते. कदम यांनी अपघाताची माहिती दिली आहे. विनायक मेटेंच्या गाडीला अपघात (Accident) झाल्यावर त्यांना जवळपास एक तास मदत मिळाली नाही. मेटेंना वेळेवर मदत मिळाली असती तर आज ते आपल्यासोबत असते, असा आरोप त्यांनी केला आहे.

मेटेंच्या अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर; काय घडलं शेवटच्या एक तासात?

विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक बड्या नेत्यांनी एमजीएम रूग्णालयामध्ये धाव घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रूग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर मीडीयाशी बोलताना विनायक मेटे यांच्या अपघाताची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

- Advertisment -

ताज्या बातम्या