Friday, May 3, 2024
Homeनाशिकपिंपळगावला नगरपालिका करण्याची मागणी

पिंपळगावला नगरपालिका करण्याची मागणी

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचारात करता ग्रामपालिकेपेक्षा आता नगरपालिकेची (Municipalities) नित्तांत गरज आहे. या शहराची साधारण लोकसंख्या 80 हजाराच्या पुढे गेली आहे.

- Advertisement -

शहराचा वेगाने विस्तार होत असून रस्ते (Road), वीज (Electricity), पाणी (Water) यासह विविध पायाभूत सुविधा पुरवितांना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. त्यामुळे पिंपळगाव शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळावा असे साकडे पिंपळगाव बसवंत भाजपच्या (BJP) पदाधिकार्‍यांनी आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar), माजी आमदार अनिल कदम (Former MLA Anil Kadam) यांच्या भेटी घेऊन नगरपालिका संदर्भात उभय नेत्यांनी शासनदरबारी आपले वजन वापरून पिंपळगाव बसवंतच्या विकासाला गती देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) माध्यमातून आ.दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांनी पाठपुरावा केल्यास पिंपळगाव नगरपालिकेच्या निर्मितीला बिलंब लागणार नाही. यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी वरवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जि.प. व पं.स. चा कालावधी चार महिन्यात संपणार आहे. तर ग्रामपंचायतीची निवडणूक दहा महिन्यांवर आली आहे.

त्यापूर्वी शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी पिंपळगाव बसवंत भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, बापूसाहेब पाटील यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार बनकर व माजी आमदार कदम यांना नगरपालिकेत रूपांतर व्हावे या संदर्भातील लेखी निवेदन दिले. पिंपळगाव ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प पाहता उपनगरातील रस्ते, पाणी, पथदीप यासह विकासांची कामे करताना मोठ्या मर्यादा आहे.

शहरात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नगरपालिकेशिवाय पर्याय नसल्याची भूमिका सतीश मोरे व बापू पाटील यांनी मांडली. याप्रसंगी शिवसेनेचे पं.स. सदस्य राजेश पाटील, भाजपचे प्रशांत घोडके, अल्पेश पारख, दत्तात्रय काळे, संदीप झुटे, महेश गांधी, नारायण जाधव, वसंत सोनवणे, राहूल सोनवणे, मदन घुमरे, किशोर कापसे, मिथुन पवार, सुदेश गांगुर्डे, सुशांत गोसावी उपस्थित होते.

पिंपळगावला नगरपालिका झाल्यास शहराच्या विकासाला चालना मिळून नगरविकास विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळणे सुलभ होणार आहे. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी यासह नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याने नगरपालिका होणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या