Tuesday, March 25, 2025
Homeनाशिककांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी

कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी

सटाणा । प्रतिनिधी Satana

कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क तातडीने हटवून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याकरिता केंद्र शासनाने प्रयत्न करण्याची शिफारस करावी अशी मागणी आ. दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.याबाबत आमदार बोरसे यांनी अधिवेशन काळात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले आहे.

- Advertisement -

Mumbai Boat Capsized : गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली

आमदार बोरसे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नाशिक जिल्हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असून, सद्यस्थितीत जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील व राज्यातील कांदा इतर राज्यात तसेच परदेशात विक्रीसाठी पाठविला जातो.आजमितीस उन्हाळी कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा विविध बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आला आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीची झगडत या कांद्याचे उत्पादन घेतले आहे.अवेळी पडलेला पाऊस आणि बदलत्या हवामानानुसार यापैकी बऱ्याच प्रमाणात कांदा खराब झाला असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजार समितीमध्ये उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळणे गरजेचे असताना त्यात दिवसेंदिवस घसरण होत आहे.

Uddhav Thackeray : मोदी-मोदी करून शाह यांना स्वर्ग मिळेल का?; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पिंपळगाव बाजार समितीत 16 डिसेंबर रोजी कांद्याला कमीत कमी 1800 व जास्तीत जास्त 3402 तसेच सरासरी 2400 दर मिळाला असून, जिल्ह्यातील इतर बाजार समितीमध्ये अशीच परिस्थिती आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावा लागत आहे. श्रीलंका सरकारने देशांतर्गत कांद्याचे उत्पादन बघता आयात शुल्क 20 टक्के कमी करून जास्तीत जास्त कांदा आयात कसा होईल याकडे लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित झालेला लाल कांदा जास्तीत जास्त परदेशात विक्रीस पाठविण्यासाठी भारत सरकारने कांद्यावर लावलेले 20% निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे.

Nashik Political : नाशिकचे पालकमंत्री कोण?

कांद्याचे दर टिकून राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगले दर मिळतील.तरी यासाठी कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्याकरिता केंद्र शासनास शिफारस करावी, अशी मागणी आमदार बोरसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असल्याचे आमदार बोरसे यांनी दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...