त्र्यंबकेश्वर | Trimbak
नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर वारकरी दिंड्यासाठी वारकरी भाविकांसाठी स्वतंत्र दिंडी मार्ग असावा करावा अशी मागणी वारकरी भाविक करीत आहे.
- Advertisement -
त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथ यात्रेला उटीच्या वारीला मोठ्या प्रमाणावर दिंड्या येत असतात.
शिवाय वर्षभर शिर्डी साई दिंड्या, प्रशिक्षणार्थी दिंड्या येत असतात. त्या त्यादृष्टीने दिंडी मार्गाचे नियोजन करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
तथापि करोनामुळे गत वर्ष ही मागणी मागे पडली होती. या रुंद रस्त्यांवर स्वतंत्र नियोजन करण्यात यावे, यासाठी मागणी करण्यात आली आहे.
फेब्रुवारी २०१४ मध्ये नाशिक त्र्यंबक रस्ता चकाचक झाला. त्यानंतर ही मागणी करण्यात आली होती. परंत त्यानंतर कोणताही पाठपुरावा न झाल्याने मागणी कागदावरच राहिली. परंतु आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागली आहे.